Marathi Bhasha Din Quotes | मराठी भाषा दिन शुभेच्छा : मराठी भाषा दिन हा प्रत्येक मराठी भाषिकासाठी अभिमानाचा आणि आपल्या मातृभाषेच्या सन्मानाचा दिवस आहे. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषेचे श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. मराठी ही केवळ भाषा नाही, तर आपली ओळख, आपली संस्कृती आणि आपला अभिमान आहे. या विशेष दिनी, मराठी भाषेच्या सौंदर्याचा गौरव करण्यासाठी आणि तिच्या समृद्ध वारशाचा सन्मान करण्यासाठी, आपण एकमेकांना सुंदर मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा आणि कोट्स पाठवतो. हॅलोमराठी तुमच्यासाठी घेऊन आला आहे खास मराठी भाषा दिन कोट्स संग्रह, जे तुम्ही आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करून मराठीचा अभिमान व्यक्त करू शकता! 🚩📖✨
Marathi Bhasha Din Quotes | मराठी भाषा दिन शुभेच्छा
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
सर्व मराठी बांधवांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
माझा मराठी चा बोल कौतुके।
परि अमृताते हि पैजा जिंके।
ऐसी अक्षरे रसिके।मेळवीन।।
आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
मराठी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा
माय मराठी! तुझ्यासाठी वात होऊनी जळते मी,
क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी.
जय महाराष्ट्र जय मराठी जय शिवराय

मराठी आमची बोली
अथांग तिची खोली
काय वर्णू तिची गोडी
अमृतासमान
नव्या रक्ताला
देऊन अनुभवाची जोड
जगात नसेल माझ्या
मराठीला तोड
आज सर्वासंगे चालतेय
प्रगतीची वाट
उद्या सूर्य उगवेल घेऊन
नव्या जगाची पहाट
जागतिक मराठी भाषा दिनाच्या सर्व
महाराष्ट्रीयन जनतेला हार्दिक शुभेच्छा
जय महाराष्ट्र जय मराठी
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
अभिमानाने बोलूया मी मराठी
मराठी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.
Marathi Bhasha Gaurav Din Wishes
मराठी मातीला नका म्हणू हीनदीन
स्वर्गलोकाहून थोर मला हिचे महिमान
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जगण्यासाठी जिंकण्यासाठी
इतर भाषांची गरज असेलही जरी
पण ठेच लागल्यावर ‘आई ग’
म्हणतो तीच असते आपली भाषा खरी.
Marathi bhasha dinachya hardik shubhechha
Also Read : मराठी भाषा गौरवदिन | Marathi Bhasha Gaurav Din
श्वासातील झिंग मराठी
जगण्याचा थाट मराठी
या संस्कृतीच्या पदराचा
जरतारी काठ मराठी

आपला मान मराठी
आपली शान मराठी
जगण्याचा ध्यास मराठी
महाराष्ट्राचा श्वास मराठी
मराठी असे आमची मायबोली जरी आज
ही राजभाषा नसे, नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढे दिव्य आशा असे.
ज्ञानोबांची तुकायची मुक्तेशांची जनाईची,
माझी मराठी गोडी रामदास शिवाजीची
अखंड राहो सदा हे शिवराष्ट्र
जयघोष करू जय जय जय महाराष्ट्र
मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या मराठी मातीचा, नका करू अवमान
हिच्या दारिद्र्यात आहे, भविष्याचे वरदान
महाराष्ट्रातील तमाम जनतेला मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
भाषेचा गोडवा साखरेहूनी फार,
मऊ मखमली असली तरी
शब्दांना तिच्या धार,
वळवावी तशी वळते
सहज सगळ्यांना कळते.
भाषेची आमच्या श्रीमंती अपरंपार
जन्मदात्री ने जग दाखवले
माय मराठी ने जग शिकवले
भिन्न धर्म व भिन्न जाती
महाराष्ट्राची अतुल्य संस्कृती
अभिमान हा जन मनी वसे
मराठी आपली मायबोली असे
मराठी दिनाच्या शुभेच्छा

मराठी
जिने आपल्याला घडवले
आता तिचे अस्तित्व टिकवणे
आपल्या हातात आहे
आग्रहाने मराठी चाच वापर करा..!
Marathi Bhasha Din Kavita
खिडक्या हवेत बांधता येत नाहीत
त्यासाठी आधी घर बांधायला हवं.
मुलांना इंग्रजी जरूर शिकवा,
शिकवायलाच हव पण त्यांचा मराठीशी,
मायभाषेची असलेला संबंध तोडू नका.
तो तुटला तर ती देशात
राहूनही परदेशी होतील
-कवी कुसुमाग्रज
माय मराठीचा दिमाख आगळा
वर्णाक्षर अन् बाराखडीचा साज वेगळा
विरामचिन्हांच्या अलंकाराने ती सजली
वृतांच्या बागेतून शब्द फुले उमलली
ज्ञानोबा, तुकोबा, जनाई आदी मेळा संतांचा,
हर एक मराठी मावळा छत्रपती शिवरायांचा.
जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय मराठी
माय मराठीचा आम्हास असे अभिमान
सर्वांना दिले तिने शब्दांचे अमोघ दान
कधी न विसर पडो तिचीया वांङमयाचा
सदैव निनादत राहो गजर मराठीचा

माझी माय मराठी
खास आहेस आमच्यासाठी
जितकी गोडी तुझी वाटावी
तितकी नाती तू जोडावी
ताकत ही तुझ्या मधील
अवर्णनीय आहे
संपूर्ण जाणले तुला तरी
ओढ तुझी कायम आहे
मन मराठी.. भावना मराठी,
जग जिंकण्या बाणा मराठी..
ओळख मराठी.. रक्त मराठी
वंदावी नित्य राजभाषा मराठी
जागतिक मराठी भाषा गौरव दिनाच्या
सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
Also Read : Raigad Fort In Marathi – किल्ले रायगड विषयी माहिती
विश्वाच्या पटलावरती
डौलात फडके पताका मराठी
मायभूमीच्या अस्मितेची,
पालखी वाहतो स्वाभिमान मराठी
मराठी आमची वेदना, मराठी आमचे गान
मराठी आमची चेतना वाणी चे शुभ वरदान
मराठी आहे आपली शान
चला वाढवू तिचा मान
मराठी आहे आपल्या श्वासात
ठेऊ तिला जीवनाच्या ध्यासात
हिंदी इंग्रजी आहे भविष्याच्या गरजा
त्यात कमी न होऊ देऊ मराठीचा दर्जा
मान आहे भाषेचा आपल्या मनी,
शुभेच्छा तुम्हास मराठी भाषा दिनी
दरी-खोर्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी…मी मराठी!
मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा