वसुबारस निमित्त शुभेच्या | Vasubaras Wishes In Marathi : स्वागत आहे हेलोमराठी.com वर!
वासुबरस, गोवत्सद्वादशीचा पवित्र दिवस, दिवाळी सणाची सुरुवात करतो आणि गाई-म्हशींच्या पूजनासाठी समर्पित असतो. या दिवशी प्रत्येकजण निसर्ग आणि गायींप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. खास “वासुबरसच्या शुभेच्छा मराठीतून” या संग्रहाद्वारे आपण आपल्या प्रियजनांना वासुबरसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देऊ शकता. या सुंदर आणि अर्थपूर्ण शुभेच्छा शेअर करून वासुबरस साजरा करा आणि आपल्या सणाची सुरुवात आनंदाने करा.
या वर्षी वसुबारस / Vasubaras हा दिवस 28 ऑक्टोबर 2024 रोजी येत आहे. या सणाला ( गोवत्स द्वादशी / Govatsa Dwadashi ) असेही म्हंटले जाते. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या द्वादशी ला गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. असे मानले जाते कि या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केल्याने सर्व देवतांच्या पूजेचे फळ मिळते. गाईमध्ये अनेक देवतांचा वास असल्याने तिच्या पूजनाने संतान सुख तसेच घरात सुख समृद्धी लाभते.
दिवाळीचा पहिला दिवस वसु बारस म्हणून साजरा केला जातो. आपली भारतीय संस्कृती कृषिप्रधान असल्यामुळे या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची तिच्या वासरासह पूजा केली जाते. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी गाईची पूजा करण्याची पद्धत आहे. शेतकरी कुटुंब या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. गाईच्या पायावर पाणी शिंपडून तिला हळद-कुंकू अक्षता वाहून तिला ओवाळले जाते. केळीच्या पानावर पुरणपोळीचा प्रसाद वाढून गाईला खाऊ घातला जातो. या पहिल्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढायची सुरुवात होते. लहान मुला बाळांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे यासाठी देखील ही पूजा केली जाते.
Vasubaras Wishes In Marathi
शेतकऱ्याचे शेती आणि मातीशी
असणारे सेंद्रिय नाते सुदृढ
करणारा वसुबारस हा सण.
या सणानिमित्ताने शुभेच्छा
वसुबारस या शब्दातील वसू
म्हणजे धन त्यासाठी
असलेली बारस म्हणजे द्वादशी
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा
सर्वांना वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा
या मंगलदिनी घरोघरी यश-समृद्धी, सुख नांदावे
हीच देवाकडे प्रार्थना…
Vasubaras Wishes Marathi
जिच्या सेवेने सर्व संकट दूर होतात
अशा गाय मातेमध्ये आहे सर्व देवांचा अंश
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा
गायी आणि वासरांची
सेवा आणि संरक्षण करा
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा
Also Read : धनत्रयोदशीची संपूर्ण माहिती | Dhanteras Information In Marathi
स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा
Vasubaras Shubhechha
गाय आणि वासराच्या अंगी असणारी
वातसल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी
हे सर्व आपणास लाभो….
वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा…
स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची
वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची
दिवाळीचा पहिला दिवस
वसुबारस सणानिमित्त शुभेच्छा…
आज वसुबारस
दिवाळीचा पहिला दिवस
ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना
सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो..
Vasubaras Caption In Marathi
स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची,
वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची..
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त
मंगलमय शुभेच्छा !
गाय आणि वासराच्या अंगी असणारी वातसल्यता,उदारता,
प्रसन्नता आणि समृद्धी आपणांस लाभो.
वसुबारस निमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा!
Vasubaras Quotes In Marathi
आज वसुबारस
दिवाळीचा पहिला दिवस!
हि दिवाळी तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची
आणि भरभराटीची जावो..!
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा !
आजपासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणाच्या
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
शुभ सकाळ!
Vasubaras Shubhechha In Marathi
वसुबारस – दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभ दीपावली..!
गोमातेला सांगू आपली गाऱ्हाणी,
दुध-दुभत्याची सदा व्हावी वृद्धी,
व्हावी कृपा, नांदावी रिद्धीसिद्धी,
गोवत्स पूजनाने लाभावी समृद्धी !
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस 😊 निमित्त,
आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..! 🙏🙏
Also Read : लक्ष्मी पूजन शुभेच्छा | Laxmi Pujan Wishes In Marathi
Vasubaras Chya Hardik Shubhechha
स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला,
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया..
परमपुज्य जी वंद्य या भारताला,
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला..
वसुबारस च्या हार्दिक शुभेच्छा..!
दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा,
गाय अन वासराच्या वात्सल्याचा…!
वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
Happy Vasubaras In Marathi
नवीन महिन्याच्या पहिली सकाळ,
आणी दिवाळीच्या पहिल्या दिव्याच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
शुभ दिपावली..!