Aai Baba Status | आई बाबा स्टेटस

100+ Aai Baba Status | आई बाबा स्टेटस

Post By : Team Helo Marathi

Post Last Updated On :

Aai Baba Status | आई बाबा स्टेटस : नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट आई वडील status दिलेले आहेत. आई बाबा, आपल्या जीवनातील दोन अनमोल रत्न, प्रेम, आधार आणि सन्मान यांचे प्रतीक आहेत. त्यांच्या निस्सीम प्रेमामुळे आणि अथक कष्टामुळे आपण या जगात काहीतरी विशेष करू शकलो. आईचे मायेचे हात आणि बाबांचे कठोर पण न्यायप्रिय शब्द यांनी आपल्या जीवनाला दिशा दिली.

त्यांच्या शिकवण, संस्कार आणि आशीर्वादामुळे आपण जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर यशस्वी ठरलो. आईबाबांच्या योगदानाची कदर करणे, त्यांचे आदर ठेवणे आणि त्यांच्या प्रेमाचे महत्व जाणणे हीच खऱ्या अर्थाने त्यांची सेवा आहे. त्यांच्या आठवणींमध्ये आणि आशीर्वादांमध्येच आपले जीवन अधिक सुंदर आणि समृद्ध होते.

Aai Baba Status | आई बाबा स्टेटस
Aai Baba Status | आई बाबा स्टेटस

आम्ही शेअर केलेले आई बाबा स्टेटस मराठी, आई बाबा सुविचार, Aai Baba Status Marathi, Mulgi Aai Baba Quotes In Marathi, Aai Baba Quotes In Marathi, Aai Vadil Quotes In Marathi वाचून तुमचं मन नक्कीच भरून आलं असेल, तेव्हा वाट कसली पाहताय… तुमच्या लाडक्या आईबाबांवरील प्रेम लगेच व्यक्त करा. यासाठी शेअर करा हे स्टेटस आणि सुविचार.

Aai Baba Status | आई बाबा स्टेटस

आयुष्यात फक्त एवढंच पाहिजे की,
यशस्वी मी व्हावं आणि
नाव मात्र माझ्या आईवडिलांचे असावं.

चारचौघात आई बापाची
मान खाली झुकू नये
असं लेकीने जगावं.
आणि आई वडिलांना
कुणापुढे हात पसरायची
वेळ येऊ नये
असं मुलाने जगावं

आईबाबा हे जगातील इतके मोठे व्यक्ती आहेत,
की ज्यांच्या कष्टाच्या घामाच्या थेंबाची परतफेड
कोणत्याच मुलांना कोणत्याच जन्मी करूच शकत नाही.

या smartphone च्या जगात
लेकरं स्मार्ट झाली
पण आई-बाप मात्र
फोन सारखी कोपऱ्यात पडून राहिलेत

काही लोकांचं प्रेम कधी बदलत नाही
आणि त्यांना आईबाबा म्हणतात

वेळेनुसार ऋतु सुद्धा बदलत असतात
जे केव्हाही बदलत नाही
ते आई वडिलांच प्रेम असत

नको धडे विश्वासाचे,
आपलं आपलं म्हणता
आपलंच सूत्र फसतं,
माय-बाप सोडून या जगात
कुणीच कुणाचं नसतं !

दोन-चार महिन्याच्या प्रेमासाठी
स्वत:चा हात कापुन घेता
तेव्हा एकदा तरी आई बाबांचा विचार
नक्की करा कारण
आपण जन्माला यायच्या आधी पासुन
ते आपल्यावर प्रेम करत असतात

आईवडील कितीही अशिक्षित असू देत,
मोठमोठ्या विद्यालयांपेक्षा जास्त संस्कार
हे आईवडिलांकडूनच मिळतात.

आई बद्दल लिहिता लिहिता
शब्द अपुरे का पडतात?
आणि बाबांबद्दल लिहायला घेतल्या
वर डोळ्यातून अश्रु का येतात?
या प्रश्नांची उत्तरे शोधायला या लेखिकेच
अख्ख आयुष्य निघून जाणार आहे

आईवडील असताना त्यांना घट्ट मिठी मारून घ्या,
कारण आठवण आभास देते पण स्पर्श देत नाही!

संपुर्ण जगाच्या विरोधात जा
पण आई वडिलांच्या विरोधात जावु नका
कारण संपुर्ण जग तुमच्या विरोधात असेल
तेव्हा आई वडील सोबत असतील

Mulgi Aai Baba Quotes In Marathi

तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे
कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार
माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात
तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे

मनाची माया फ़ार निरागस असते..!
ती मनाला आपल्या प्रेमात गुंतवते..!!
जो कोणी त्या मायेत कधी गुरफ़टला..!
त्याचे मन, त्या मायेच्या मायाजाळात हरवते..!!

स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत कालाची माता आहे.
देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे आणि
घरातील माता-पिता हे शिक्षक आहेत.

डोळ्यात पाणी आले जेव्हा बाबांकडे नवीन शर्ट
आणि स्वेटरसाठी पैसे मागीतल्यावर त्यानी
विचारल ते तुझं जुनं मी घातले तर चालेल का

तुमची आठवण तर रोज येते पण तुम्ही यायला हवं असंही रोज वाटते

जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल
पण आईची माया आणि
वडिलांच प्रेम कितीही पैसे खर्च केले तरी
मिळणार नाही…

कोणी सोबत असो वा नसो आईची माया
आणि वडिलांचे प्रेम यातच मी समाधानी आहे.

सोबत कोण नसेल तर थांबु नका
कारण कोणी सोबत नसेल तरी
आई वडिलांचे आशिर्वाद
कायम सोबत असतात

आईबाबा कितीही मोठा झालो तरी तुझ्यासमोर लहानच आहे,
अजून आजही शांत झोप लागते मला कारण डोक्यावर तुमचा हात आहे.

यश मिळाल्यावर तर मोठ-मोठे
लोक मागे लागतात
पण अपयशी असताना
यशाचा मार्ग दखवणारे
फक्त आई वडिलच असतात

आईबाबा शब्दात मांडण्याएवढे लहान नाहीत…
आणि आईबाबांना शब्दात मांडण्याइतका मी मोठा नाही.

दुःख कितीही मोठ का असेना
प्रत्येक दुःख विसरून जातो
जेव्हा आई वडिल समोर असतात

कधी खिसा रिकामा असला तरी,
कोणत्या गोष्टीला नाही म्हणाले नाही.
माझ्या आईवडिलांसारखी मनाने श्रीमंत
माणसं मी या जगात कुठेच पाहिली नाही.

आई वडिलांपेक्षा
मोठी संपत्ती
कोणतीच नाही

लोक काय म्हणतील याचा विचार करत बसाल तर,
आईवडिलांची स्वप्नं तुम्ही केव्हाच पूर्ण करू शकणार नाही.

ज्यांना आपल्या आई वडिलांची
किंमत कळत नाही
त्यांना प्रेमाची किंमत काय कळणार

सर्वांना सुट्टी असते,
पण आईवडीलांना कधीच सुट्टी नसते.

Gf नाही
i Phone नाही
बंगला नाही
Car नाही
तरी पण मी खुप खुश आहे
कारण फक्त सोबत आई वडील आहेत

औषधं आणि आईवडील दोघं सारखेच असतात,
थोडेसं कडवट वाटतात पण आपल्या फायद्यासाठीच असतात.

संपत्ती च्या मागे धावता धावता
सर्वात मोठी संपत्ती आई वडील आहे
हे विसरु नका

आईबाबांनी मला सगळं शिकवलं
पण त्यांच्याशिवाय राहायचं कसं ते शिकवलं नाही.

रोज कित्येक जण सोबत असतात
पण मोठ्या संकटात फक्त
आई वडिलच साथ देतात

आपले चिमुकले हात धरून जे
आपल्याला चालायला शिकवतात जे
आपले आईबाबा असतात.

I Am Alone असे खुप जण स्टेटस टाकतात
पण आई-वडील सोबत असताना
आपण स्वतःला एकट का समजाव

ज्यांनी तुमचे बोट पकडून चालायला शिकवलं
त्यांना कधीच विसरू नका
मनातलं जाणणारी आई आणि
भविष्य ओळखणारा बाप हेच
या जगातील एकमेव ज्योतिषी आहेत.

आयुष्य मजेत जगा कारण
आपण दुःखी असेल तर
आई बाबांशिवाय कोणाला काही
फरक नाही पड़त
उगाच आपल्यामुळे आई बाबा देखील
दुःख नको

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
100+ सैड स्टेटस मराठी मध्ये
300+ इंस्टाग्राम कॅप्शन
नॉन व्हेज जोक्स मराठी
300+ Best Birthday Wishes Marathi For Friend [2024]
Mummy Papa Anniversary Wishes Marathi – आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Aai Baba Quotes In Marathi

आईबाबा तुम्ही सोबत आहात म्हणून कशाची चिंता नाही…

खरा आनंद तर तेव्हा होईल
जेव्हा पैसे माझे असतील आणि
शॉपिंग माझे आईबाबा करतील.

प्रेम करायचं असेल तर आईवडिलांवर करा,
आयुष्यात कधीच ब्रेकअप होणार नाही.

का कुणावर प्रेम करावं,
का कुणासाठी झुरायचं,
का कुणासाठी मरायचं,
देवाने आईवडील दिले आहेत,
त्यांच्यासाठीच सगळं करायचं…

देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना करा,
सुखी ठेव त्यांना ज्यांनी जन्म दिलाय मला

आयुष्यात प्रत्येकजण स्वतःसाठी जगत असतो,
पण आईवडील मात्र फक्त आपल्या मुलांसाठी जगत असतात.

सातजन्मांसाठी काही द्यायचं असेल
तर देवा एकच दे हेच आईवडील सातजन्म दे

दुनियादारी अनुभवली की कळतं की,
आईवडिलांशिवाय कोणीच आपलं नसतं

आईबाबाचं प्रेम आपल्याला वेळ असते
तेव्हा कळत नाही पण सत्य हेच आहे की,
आईबाबांसारखं प्रेम या जगात
आपल्यावर कोणीच करू शकत नाही.

जगातलं सर्वात मोठं यश म्हणजे
आपल्यामुळे आईबाबांच्या चेहऱ्यावर
आलेला आनंद आणि समाधान!

देवाची पूजा करून आईवडील मिळवता येत नाहीत,
आईबाबांची पूजा करून देव मात्र नक्कीच मिळवता येतो.

मी मोठा नाही हो,
माझ्या मागे जी ताकद उभी आहे ना!
ती खूप मोठी आहे…
आईवडील

आयुष्यात काही नसेल तरी चालेल
पण आईवडिलांचा हात नेहमी पाठिशी असावा.

जग सोबत नसलं तरी चालेल
पण आईबाबा नेहमी सोबत असले पाहिजेत.

आईवडील घरात असताना लोक मंदिरामध्ये देव का शोधतात

Aai Vadil Quotes In Marathi

पैशांने सर्व काही मिळेल,
पण आईसारखा स्वर्ग आणि
बापासारखी सावली कुठेच मिळणार नाही.

सात जन्मांसाठी काही द्यायचं असेल तर देवा,
हेच आईवडील दे.
कारण त्यांनी आजवर मला
काहीच कमी पडू दिलं नाही.

विश्वास बापावर ठेवा आणि प्रेम आईवर करा,
ना कधी धोका मिळेल, ना कधी मन तुटेल…

नात्यांची दोरी नाजुक असते,
डोळ्यांतील भाव ही ह्रदयाची भाषा असते,
जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती व प्रेमाचा अर्थ,
तेव्हां एक बोट आईकडे तर दुसरे बोट बाबाकडे असते…

आईवडिलांच्या कष्टांची जाणिव असणारी व्यक्ती कधीच वाया जात नाही.

या जगात फक्त आपले आईबापच असतात, बाकी कोणी कोणाचे नाही…

जगातील अनमोल गोष्ट म्हणजे आपले आईवडील…
कारण त्यांच्याइतकं प्रेम आपल्यावर दुसरं कोणीच करत नाही.

स्वतः आधी जे तुमचा विचार करतात ते आईबाबा

आयुष्य एक दिवा आहे पण
त्या दिव्याला उजेडात आणणारी
ज्योत म्हणजे आपले आईबाबा

तुमची झोप मोडली तरी चालेल,
पण आईवडिलांची स्वप्ने नाही मोडली पाहिजेत.

हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण
आपल्या चुकांना माफ करणारे
आईवडील पुन्हा कधीच मिळणार नाहीत.

आयुष्यात सगळी नाती नकली असतात,
वेळ आली की सगळे साथ सोडतात…
या आयुष्यात फक्त दोनच नाती आयुष्यभर सोबत राहतात…
एक आईचा मायेचा हात आणि बापाची साथ!

आईवडिलांनी दिलेल्या सल्ल्यावर औषधांप्रमाणे विश्वास ठेवा,
कारण ते थोडे कडू असतात पण जीवनात प्रत्येक वेळी संजिवनी ठरतात.

स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी आपल्यावर प्रेम करते तिला आई असं म्हणतात,
आणि डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात.

या जगात आईबाबा सोडून आपली कदर दुसऱ्या कोणालाच नसते हे कधीच विसरू नका.

तुमचं भलं व्हावं असं जगात फक्त तुमच्या आईबाबांनाच वाटत असतं…

आम्ही शेअर केलेले आई बाबा स्टेटस मराठी, आई बाबा सुविचार, Aai Baba Status Marathi, Mulgi Aai Baba Quotes In Marathi, Aai Baba Quotes In Marathi, Aai Vadil Quotes In Marathi वाचून तुमचं मन नक्कीच भरून आलं असेल, तेव्हा वाट कसली पाहताय… तुमच्या लाडक्या आईबाबांवरील प्रेम लगेच व्यक्त करा. यासाठी शेअर करा हे स्टेटस आणि सुविचार.

Leave a Comment