Krushi Din Quotes In Marathi

Krushi Din Quotes In Marathi | महाराष्ट्र कृषी दिन शुभेच्या

Post By : Team Helo Marathi

Post Last Updated On :

Krushi Din Quotes In Marathi : हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे वसंतराव फुलसिंग नाईक यांच्या स्मरणार्थ १ जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्रातील कृषी सप्ताहाची सुरुवात देखील करतो, जो १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत चालतो.

हा आठवडा राज्यातील कृषी विकासाला चालना देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या योगदानाची ओळख करून आणि कृषी विद्यापीठे आणि संस्थांची स्थापना करण्यासाठी नाईक यांच्या प्रयत्नांचा गौरव करतो. त्यांचा मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ.

Krushi Din Quotes In Marathi

स्वतःचं घर गळत असूनही पावसाची
अपेक्षा करत असतो तो फक्त शेतकरी
महाराष्ट्र कृषी दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

करून शेती उगवून धान
यातचं खरी बळीराजाची शान
सर्व शेतकरी बांधवांना
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्या दिवशी भाकरी पिझ्झ्याप्रमाणे ऑर्डर करावी लागेल,
त्या दिवशी या देशाला शेतकऱ्याची किंमत कळेल
महाराष्ट्र कृषी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

कष्ट करीतो शेतकरी
पिकवितो रान मोती
राब राब राबून घामात
ओली झाली काळी माती
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Maharashtra Krushi Din Quotes In Marathi

शेतकरी श्रीमंत आहे,
कारण मनाचा तो राजा आहे
महाराष्ट्रातील
सर्व शेतकरी बंधू भगिनींना
महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

शेतीचे अंतिम उद्दिष्ट पिके वाढवणे हे नसून सभ्यता जोपासणे हे आहे. तुम्हाला महाराष्ट्र कृषी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

शेताच्या बांधावर बसून शेतीची कामं होत नाहीत
आणि शेतकऱ्याच्या जन्माला आल्याशिवाय
त्याची दुःखे कळत नाहीत!
नानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा!

आमच्या शेतकऱ्यांशिवाय, आम्हाला आमच्या आहारात दुर्दैवाने कमतरता आली असती आणि असंख्य प्रक्रिया केलेले आणि अस्वास्थ्यकर अन्न खाण्यास भाग पाडले गेले असते.

शेतातील पिक शेतकऱ्यांच्या हाताने पिकते
शेतातीलच सोन्याने सर्वांचे पोट भरते”
कृषी दिनाच्या सर्व शेतकऱ्यांना
मनपूर्वक शुभेच्छा

Maharashtra Krushi Din Quotes In Marathi

कडाक्याचे ऊन असो वा सोसाट्याचा वारा,
मुसळधार पाऊस असो वा ओल्या चिंब धारा,
शेतात राबतो आपला सर्जा राजा.
महाराष्ट्र कृषी दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

महाराष्ट्र कृषी दिन
धरणी मातेची भरून ओटी
उपकार तुझे आम्हा युगे युगे
कोटी कोटी नेसूनी हिरवा शालू…
बीज रुजवून भरतो तुझी
आनंदानं ओटी…
महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा

आपल्या सर्वांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
अन्नाचा अधिक आदर करूया,
शेतक-यांचा अधिक सन्मान करूया.
पुढचा दिवस चांगला जावो.

कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा,
रात्रभर झोप लागणार नाही, विचार करा…
शेतकऱ्याचं काय होत असेल.
सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्र कृषी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

Maharashtra Krushi Din Quotes In Marathi

शेती दिन हा दिवस आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन रात्रंदिवस मेहनत केल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे आभार मानावेत जेणेकरून आपल्याला खायला चांगले अन्न मिळेल.

तू कण ह्या मातीचा, हे धान तुझं लेकरू
आरे काय भ्या तुला वारा धूनाची
उभ्या आस्मंताचं तू पाखरू
महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

शेतीमुळेच सभ्यता निर्माण होते आणि शेतीतूनच आपल्याला शक्ती मिळते. महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा.

शेतकरी आहे अन्नदाता
तोच आहे
देशाचा खरा भाग्यविधाता
कृषी दिनाच्या सर्व शेतकऱ्यांना
मनपूर्वक शुभेच्छा

Leave a Comment