Shivrajyabhishek Din Wishes | शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा

Shivrajyabhishek Din Wishes | शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा

Post By : Team Helo Marathi

Post Last Updated On :

Shivrajyabhishek Din Wishes, Status | शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा | शिवराज्याभिषेक सोहळा शुभेच्छा : शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा एक मंगलमय आणि जनतेसाठी महत्त्वाचा दिवस होता. या प्रसंगी शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद स्वीकारले, ज्याचा अर्थ सार्वभौम आणि सर्वेसर्वा असा होतो. राज्याभिषेकानंतर त्यांनी राज्याचा कारभार सांभाळण्यासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. रायगडावर संपन्न झालेल्या या शिवराज्याभिषेक सोहळ्यात शिवरायांसोबतच त्यांच्या पत्नी सोयराबाई यांचा महाराणी म्हणून आणि संभाजी महाराजांचा युवराज म्हणून अभिषेक करण्यात आला होता.

Shivrajyabhishek Din Wishes | शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा
Shivrajyabhishek Din | शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा

Shivrajyabhishek Din Wishes

अवघ्या महाराष्ट्राला लागला ज्यांचा लळा
त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिवभक्त झाले गोळा
डोळ्यांचे पारणं फेडणारा असा हा राज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!

इतिहासालाही धडकी भरेल
असं धाडसं या मातीत घडलं,
दगड-धोंड्यांच्या स्वराज्यात
सुवर्णसिंहासन सजलं
शिवराज्याभिषेक दिनाच्या
सार्‍या शिवभक्तांना शुभेच्छा!

शिवरायांचे आठवावे रूप
शिवरायांचा आठवावा प्रताप
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!

”माती साठी प्राण सांडतो युद्ध मांडीतो ऐसा राजा
जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षितो ऐसा राजा”
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

”होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा,
थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं …
दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं…
पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी …
अन साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर “शिवबाचच” काळीज हवं…
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा…

शिवराज्याभिषेक सोहळा शुभेच्छा | Shivrajyabhishek Din Status

सोहळा हा स्वराज्याचा,
महाराष्ट्राचा अस्मितेचा
सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा

दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं…
अन साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर “शिवबाचच” काळीज हवं…!!
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

”प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा”
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा

शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!
जय शिवराय

निश्चयाचा महामेरू।
बहुत जनासी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू।
श्रीमंत योगी।।
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!

तुम्हाला पुढील पोस्ट सुद्धा आवडतील

स्वराज्याचा ज्यांना लागला होता ध्यास
स्वराज्य मिळवणे ही एकच होती ज्यांची आस
त्यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा रंगला आज खास
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा

शिवराज्याभिषेक दिनी
छत्रपती शिवाजी महाराजांना
मानाचा मुजरा

Leave a Comment